अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास इसमास स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणा पथकाने काळेगाव येथे १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून २०१० रुपयाचा देशीदारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.पो का भारत जाधव यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काळेगाव येथे छापा टाकून अंबादास धोंडुजी तायडे, वय 46 वर्ष, रा. काळेगाव यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू ५० नग जप्त.