भोकरदन: हसनाबाद येथे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी केली पेट्रोल पंपावर एकच गर्दी
आज दिनांक 26 मार्च 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे, बऱ्याच पेट्रोल पंपावर परिसरात पेट्रोल व डिझेल उपलब्ध नसल्यामुळे व हसनाबाद येथील पेट्रोल पंप चालू असल्याची माहिती होतच परिसरातील गावातील नागरिकांनी आपले वाहने घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती व यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.