परतूर: खरिपात झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला नाही,कोर्टात दाद मागणार-गजानन उगले,शेतकरी बस स्था. येथे इशारा
Partur, Jalna | Apr 25, 2026 आज दिनांक 25 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील बस स्थानक परिसरामध्ये शेतकरी नेते तथा शेतकरी गजानन उगले यांनी पीक विमा कंपन्यांना व सरकारला इशारा दिला आहे की सन 2025 च्या खरीप हंगामामध्ये परतुर तालुक्यासह जिल्हाभरात खरीप पिकांचे सोयाबीन, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी विमा काढला होता मात्र या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही,त्यामुळे तात्काळ विमा द्यावा,नसता कोर्टात दाद मांगणार असल्याचा इशारा त्यांनी विमा कंपनी व सरकारला दिला आहे.