अकोट: दिवाळी सुट्टीच्या हंगामामुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी;सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची गरज
Akot, Akola | Nov 1, 2025 दिवाळी सुट्टीच्या हंगामामुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळत आहे.या वाढत्या गर्दीमुळे पाकीटमार व इतर उपद्रवखोर सक्रिय झाले आहेत. दिवाळी सुट्टीच्या हंगामातील गर्दी ही चोरांसाठी सुगीची ठरत असल्याने बस स्थानकावर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची गरज असल्याचे प्रवाशांमधून बोलल्या जात आहे तर काही दिवसाआधीच अकोट बस स्थानकावर दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहीती आहे. त्यामुळे दिवाळीच्या गर्दी वेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय