कारंजा: समृद्धी महामार्गावर ट्रक पलटी; चालक आणि क्लिनर गंभीर जखमी
5 नोव्हेंबर रोजी कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावर ट्रक पलटल्याने चालक दिलीप घोष आणि क्लिनर राहुल घोष गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून अमरावतीत पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बचाव कामात रुग्णवाहिका व अग्निशमन दलानी मोठे सहकार्य केले.