राजूरा: राजुरा तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम कळमना येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व लक्षात घेऊन येथे अनेक फळ, फुल व शोभिवंत झाडे सातत्याने लावली व जगवली जात आहेत. आज दि 5 जून ला 11 वाजता पर्यावरण दिनानिमित्त येथे कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.