राजूरा: संविधान चौक येथे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल ;एका आरोपीस अटक
गोपनिय माहितीचे आधारे पोलीस ठाणे राजुरा हद्दीतील संविधान चौक येथे आज दि ५ जून ला १२ वाजता नाकाबंदी करून एक ऑटो क्रमांक MH34-D-6339 यास थांबवून पंचासमक्ष पाहणी की असता सदर ऑटो चालक अविनाश आबाजी शेंडे वय ४२ वर्ष रा. बाबुपेठ चंद्रपूर याचे ताब्यात ऑटो मधील बोरी मध्ये प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु आढळून आल्याने आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.