राजूरा: गडचांदूर-राजूरा महामार्गावर नाईकनगर गावाजवळ दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
गडचांदूर-राजूरा महामार्गावर नाईकनगर गावाजवळ काल दि.३ जून रात्री ७.३० वाजता दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात उमेश लेंनगुरे (वय ३८, रा. चिरोली, ता. मूल) यांचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सदर महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यावर योग्य दिशादर्शक फलक लावले गेलेले नाहीत.सदर घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून तपास सुरू आहे.