कल्याण: कल्याणमध्ये 50 रुपयाच्या खंडणीसाठी नशेखोरांनी भरदिवसा दुकानदारावर केला जीवघेणा हल्ला, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Kalyan, Thane | Oct 23, 2025 कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोड येथे सराईत गुन्हेगारांनी पन्नास रुपयांच्या खंडणीसाठी दुकानदारावर भर दिवसा जीवघेणा हल्ला केला आहे. गुन्हेगार दीड वर्ष सजा बघून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. झालेल्या हल्ल्यामुळे दुकानदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका आरोपीला महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाच आरोपी फरार आहेत. मात्र भर दुपारी झालेल्या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.