युवकांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या वतीने आयोजित होणारा हा महोत्सव दि. 7 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे पार पडणार आहे.