पुसद येथील सामाजिक संघटना माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद,मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था पुसद व वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद यांच्या तर्फे निंबी येथील अल्पभूधारक शेतकरी शिवराम शेट्टे यांची सुकन्या डॉ. अंकिता हिने नुकतीच बी.ए.एम.एस.ही पदवी प्राप्त केली आहे.तिला ही पदवी आयुर्वेदिक महाविद्यालय वाशिम रोड पुसद येथून मिळाली आहे.अतिशय विपरीत परिस्थिती, निंबी सारखा ग्रामीण विभाग असतांना अगदी स्वतः च्या कर्तृत्वाने तिने आई-वडिलांचे शेतातील कष्ट व खराब दिवस पाहून हे यश मिळवले.