कंटेनरच्या धडकेत मोटर सायकल चालक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सातपूर पपया नर्सरी जवळ घडली असून सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आले आहे.स्वाती संतोष वेल्हेकर या दुचाकीवर सातपूर येथून जात असताना पपया नर्सरी जवळ एका कंटेनरने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.यात त्यांच्या डोक्याला हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरिकांनी औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.