कारंजा: आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक इमरान पारेख यांची पत्रकार संघाला सदिच्छा भेट
Karanja, Washim | Feb 22, 2026 कारंजा :आज २२ फ़ेब्रुवारी २०२६, रविवार रोजी शहरातील तरुण, अभ्यासू व सर्वसमावेशक दृष्टी असलेले नगरसेवक इमरान पारेख यांनी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान शहर विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. नगर परिषदेच्या विविध कामांचा आढावा घेताना त्यांनी केलेल्या लहान-लहान पण प्रभावी विकासकामांचा उल्लेख केला. त्यांच्या कार्याची व्याप्ती इतकी मोठी की, माणुसकी जपणारा हा तरुण कार्यकर्ता भविष्यात शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नवा चेहरा ठरेल, उपाद्यक्ष तथा ‘कारंजा स्वाभिमान’ साप्ताहिकाचे संपादक सलीम खान शेर खान यांनी इमरान पारेख यांच्या कार्याचा