' *माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' मोहिमेसाठी गोंदिया जिल्हा प्रशासन सज्ज; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती*
3.4k views | Gondia, Maharashtra | Mar 25, 2026 राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे निरोगी समाज घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी पाठविलेले विशेष पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी * जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती मा. सुरेशजी हर्षे यांना सुपूर्द केले