महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ आयोजित स्व. बापुजी फाउंडेशनच्या प्रायोजनात दि. 07 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:00 वाजेच्या सुमारास कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय, भडगाव येथे समाजप्रबोधनात्मक भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रसिद्ध समाजप्रबोधनकार हभप गोविंद महाराज यांनी आपल्या भारूडातून भ्रष्टाचार, दांभिकता, सामाजिक विषमता, अंधश्रद्धा तसेच राजकीय उदासीनतेवर परखड शब्दांत प्रहार केला.