नाशिक: शहरातील पंचवटी, आडगाव, नाशिकरोड, सिडको येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मिरवणूक संपन्न
Nashik, Nashik | Jul 31, 2025 नाशिक शहरातील पंचवटी आडगाव नाशिक रोड सिडको या भागात आज दिनांक 31 गुरुवारी रात्री नऊ वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा मिरवणुका संपन्न झाल्या. यानिमित्त ठिकठिकाणी चौकाचौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. रात्री उशिरापर्यंत शहरात फटाक्यांच्या आतषबाजी सुरू होती.