नागपूर शहर: महावितरण कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला, बिलाच्या वादातून घडली घटना : राहुल मदने, पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 11 जुलै ला सकाळी 11 वाजता दिलेल्या माहितीनुसार शहरातील महावितरणच्या बिनाकी उपविभाग कार्यालयात एका संतापलेल्या ग्राहकाने घुसून सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबद्दल आरोपीविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.