शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ७.१८ लाखांची फसवणूक. लोहगाव येथील ३९ वर्षीय इसमाला ऑनलाईन माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून ७ लाख १८ हजार ७३६ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात मोबाईलधारक व बँक खातेधारकांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून विविध खात्यांमध्ये पैसे जमा करवून घेतले. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५५९/२०२५ भा.दं.सं. कलम ३१९(२), ३१८(४) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कल