रोहा: इको सेन्सेटिव्ह झोनला ग्रामस्थांचा विरोध; देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली ग्रामस्थांचा बैठक घेत संताप व्यक्त
रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसीलकडून देण्यात आला. जिल्ह्यातील 437 गावे ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचे या मसुदामध्ये आहे. यात रोहा ता.119 गावांचा समावेश आहे. मात्र देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली ही अशी गावे आहेत कि, त्या गावापासून पर्यावरणाला हानी पोहचविण्यासारखी परिस्थिती नाही. असे असताना शासनाने या गावांची नावे घेतल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे. रविवारी 6 जुलै रोजी बैठक घेत इको सेन्सेटिव्ह झोनला विरोध केला.