परतूर: रेल्वे स्टेशन,बस स्थानक,मुख्य बाजारपेठेत 42 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे शुकशुकाट
Partur, Jalna | May 15, 2026 आज दिनांक 15 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानक मुख्य बाजारपेठ तसेच ग्रामीण भागात आज उन्हाचा पारा चढला होता यामध्ये 42 डिग्री सेल्सिअस तापमान होते त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळले आहे तसेच जिल्हा प्रशासनाने 13 मे ते 15 या कालावधीमध्ये तापमान जास्त राहणार आहे या मुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन दिले होते त्याला प्रतिसाद देत आज शहरासह ग्रामीण भागात मुख्य ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला आहे.