नागपूर शहर: नागपुरात घरफोडी व वाहन चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद
12 जुलैला दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट १ ने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी हर्ष रामटेके आणि अर्जुन सोलंकी या दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी अजनीतील घरफोडीसह एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अ