मसुरीत कौटुंबिक वादातून महिलांमध्ये राडा; भररस्त्यात चप्पलांचा वापर, पर्यटकही करू लागले डान्स!
उत्तराखंडमधील मसुरी येथील पिक्चर पॅलेस चौकात कौटुंबिक वादातून महिला आणि तरुणींमध्ये जोरदार हंगामा झाला. पाहता पाहता वाद इतका वाढला की भररस्त्यातच एकमेकींवर चपला फेकण्यात आल्या. परिस्थिती शांत करण्यासाठी आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांशीही महिलांनी वाद घातल्याचे समोर आले. तसेच, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. दरम्यान, रस्त्यावरील हा गोंधळ पाहून काही पर्यटक चक्क डान्स करू लागले.
#Mussoorie #UttarakhandNews #StreetFight #ViralNews #BreakingNews
Pune City, Pune | Oct 10, 2026