लांजा: घरफोडीच्या प्रयत्नात दुचाकीवरील दोघा चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले
लांजा तालुक्यातील रिंगणे-गांगोवाडी येथे शनिवारी सायंकाळी बंद घरात चोरीसाठी शिरलेले संजय उर्फ मोहन भोसले आणि नितेश उर्फ संतोष भोसले यांना ग्रामस्थांनी धाडसी पाठलाग करून कारवली येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.