लातूर: बदलते लातूर की बदलती तस्वीर ? शहरात कोयत्यांचा दहशतवादी खेळ; सायंकाळी उघड्यावर प्राणघातक हल्ला, दोन गंभीर
Latur, Latur | Nov 1, 2025 लातूर -लातूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा चेहरा स्पष्ट दिसला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज संध्याकाळच्या सुमारास पिंटू हॉटेल परिसरात धक्कादायक घटना घडली. परिसरात तीन तरुण बसलेले असताना दोन हल्लेखोर कोयते हातात घेऊन तिथे दाखल झाले. दरवाजा उघडताच त्यांनी थेट तीन तरुणांवर कोयत्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.