भोकरदन: भाजपा संपर्क कार्यालयावर पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान शिबिर संपन्न
आज दिनांक 27 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन शहरातील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयावर पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान शिबिर संपन्न झाले, या शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यानांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या समृद्ध इतिहास पक्षाची ध्येय धोरणे व कार्यकारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन दानवे यांनी केले आहे ,यावेळी आमदार संतोष दानवे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.