नागपूर शहर: महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 11 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार मिथिलेश विरसिंग वरखडे याला महिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून पीडितेला फोनवर त्रास देत होता. ८ जुलैच्या रात्री आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन गैरवर्तन केले आणि पतीला मारहाण करून महिलेलाही जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.