*माकडताप (कॅसनूर फॉरेस्ट डिसीज ) व हत्तीरोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजनां बाबत जिल्हा टास्क फोर्स ची सभा मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न* माकडताप व हत्तीरोग आजाराच्या अनुषंगाने जिल्हा टास्क फोर्सची सभा मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. सदर सभेमध्ये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रमेश करतस्कर यांनी विस्तृत सादरीकरण केले. माहे.जानेवारी ते मे या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यांमध्ये माकड तापाचे रुग्ण आढळून येतात. यावर्षी अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही.