नांदुरा: शेलगाव मुकुंद येथे महिलेला अश्लील शिवीगाळ, गुन्हा दाखल
नातेवाईकांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय महिलेला दोघांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथे घडली.याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान नांदुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .