समुद्रपूर: जिल्हात ओला दुष्काळ घोषित करा :आम आदमी पार्टीची शहरातील तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी
समुद्रपुर:वर्धा जिल्हा ओला दुष्काळ घोषित आम आदमी पार्टीच्या वतीने तहसिलदार यामार्फत जिल्हा उपाध्यक्ष विनोद हिवंज यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे की.वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात सततच्या महिन्याभरापासून अतिवृष्टी व जास्त पाऊस पडल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीपिकाचे (सोयाबीन, तूर, कापूस व इतर पिकांचे) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेत जमीन खरडून निघाली आहे. उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.