आषाढी एकादशीच्या दिनी वैजापूर शहरातील एकटा विठोबा मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या मंदिराचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे असे म्हटले जाते की वैजापूर ही एकनाथ महाराजांची सासुरवाडी आहे. एकनाथ महाराज वैजापूरला आले होते तेव्हा ते याच मंदिरात मुक्कामी थांबले होते.