हिंगणघाट: नगरपरिषदेच्या घंटगाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा मात्र कर्मचारी आंदोलनावर ठाम
पालिकेतील घंट गाडी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ, पीएफ आणि चार सुट्ट्या आणि इतर मागण्या मंजूर कराव्यात अशी संघटनेची मागणी आहे.नगरपालिका प्रशासनाने विश्वास हायड्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड नागपूरला हे कंत्राट दिले आहे. प्रशासन आणि कंपनीच्या संगनमतामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा युनियनचा आरोप आहे. युनियनने मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्याशी चर्चा केली परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही, म्हणून आंदोलन सुरू करण्यात आले.या आंदोलनाचा शहरातील कचरा संकलनावर परिणाम होणार आहे.