हिंगणघाट: वाघसावली येथे पोलिसांची अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई, ४ लाख ११ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना पथकाल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाघसावली येथे नाकेबंदी करून कार क्रमांक MH 31 CR 7517 ने येत असलेली अवैध दारूसह ४ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून यासंबंधी कार चालक अजय हजारे वय ४३ वर्ष राहणार आंबेडकर काँलेज जवळ आकाशवाणी रोड चंद्रपूर यास अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे,याच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली आहे.