हिंगणघाट: मांडगाव येथील श्री संत बऱ्हाणपुरे महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त भव्य दिंडी शोभायात्रा: आमदार कुणावार सहभागी
मांडगाव येथे श्री संत बऱ्हाणपुरे महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने भव्य दिंडी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या संपूर्ण कार्यक्रमात आमदार समिरभाऊ कुणावार यांनी श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहात सहभागी होत दर्शन घेतले, संतांच्या चरणी नतमस्तक होत भक्तिभावाने सप्ताहातील दिव्य वातावरण अनुभवले.संत बऱ्हाणपुरे महाराज हे ग्रामीण भागातील आध्यात्मिक क्रांतीचे महान दीपस्तंभ होते. त्यांचे जीवन भक्ती, ज्ञान आणि समाजकल्याणाला समर्पित होते.असे मत आमदार कुणावार यांनी व्यक्त केले.