हिंगणघाट: आधार फाउंडेशनच्या वतीने शहरातील साई मंदिर,नंदोरी रोड वरुन वृक्षारोपण मोहीमचा शुभारंभ
हिंगणघाट :पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि उदात्त हेतू पुढे ठेवून दरवर्षी आधार फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण केले जाते आतापर्यंत हिंगणघाट शहरांमध्ये शेकडो वृक्षांचे रोपण करण्यात आले हिंगणघाटचा परिसरातील हरित आच्छादन वाढवण्याचे दृष्टीने साई मंदिर, नंदोरी रोड या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या *कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय सौ.लताताई मोहता, उद्योजक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, डॉ. राहुल मरोठी,डॉ. मोहन खेतल ,डॉ.विजय मोरे ,श्री.राजू चौधरी उपस्थित होते.