अहमदपूर: साक्षात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन. आमदार संजय गायकवाड यांनी हडोळती येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्याला भेटून दिली प्रतिक्रिया
*साक्षात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन लाभल्याची भावना...!* हाडोळती येथील वृद्ध शेतकरी दांपत्याच्या पूजनातून आमदार संजय गायकवाड यांनी दिली प्रतिक्रिया लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावातील ७६ वर्षीय वृद्ध शेतकरी अंबादास गोविंद पवार आणि त्यांच्या पत्नीची नांगर चालवतानाची एक दृश्ये काही दिवसांपूर्वी समोर आली होती. बैलजोडी नसल्याने दोघं पती-पत्नी खांद्यावर नांगर घेऊन शेती करत असल्याचं दुर्दैवी दृश्य पाहून महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त झाली.