वर्धा: दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना नोंदणी आवश्यक: 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Nov 27, 2025 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणात नागरीक, नागरी समाज संघटना, संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावतात. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या संस्थांची नोंदणी झाली नसेल अशा पात्र संस्थांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.