नाशिक: मुंबई नाका भागातील श्रीराम नगर येथे अंधारात चोरी किंवा घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या एकाला पोलिसांनी केली अटक
Nashik, Nashik | Oct 17, 2025 मुंबई नाका भागातील श्रीराम नगर येथे अंधारात चोरी किंवा घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास रामचंद्र दीपके हा अंधाराचा फायदा घेऊन श्रीराम नगर येथील एका अपार्टमेंट मध्ये संशयस्पद फिरत असताना पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी त्याला हटकले असता पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.