परभणी जिल्ह्यातील काही भागात बिबट्याचा वावर असल्याचे पाऊलखुणावरून शक्यता नाकारता येत नाही. नागरीकांनी बिबट्याचा वावर आहे हे समजूनच शेतातील कामे करावीत. जेणे करून बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करता येईल. बिबट्या दिसल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनाधिकारी जाधव यांनी शेतकरी आणि नागरिकांना केले आहे.