अंबड: गुंज येथील गोदावरी नदी पात्रात उपविभागीय अधिकाऱ्यांची 'सर्जिकल स्ट्राईक'
Ambad, Jalna | Apr 8, 2026 गुंज येथील गोदावरी नदी पात्रात उपविभागीय अधिकाऱ्यांची 'सर्जिकल स्ट्राईक' दिवसाढवळ्या वाळू उपसा करणाऱ्या 'केण्या' जप्त; माजलगावच्या वाळू माफियांचे धाबे दणाणले अंबड (विशेष प्रतिनिधी): निसर्गाची मुक्त उधळण लाभलेल्या गोदावरी नदीच्या पात्राला गेल्या काही वर्षांपासून वाळू माफियांच्या काळ्या नजरेचे ग्रहण लागले आहे. महसूल प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकून दिवसाढवळ्या कोट्यवधी रुपयांच्या वाळूची लूट करणाऱ्या या माफियांवर आता प्रशासनाने कडक बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. घनसावंगी तालुक्यातील गुंज