परतूर: सातोना येथे अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतूक करणारा 1जण ताब्यात ,86 हजार रुपयाची दारू व दुचाकी जप्त
Partur, Jalna | Jul 5, 2026 आज दिनांक 5जुलै 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील सातोना येथे अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतूक करणारा संशयित आरोपी शुभम उद्धवराव कदम राहणार देऊळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी याला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून 21 हजार रुपयाची दारू साठा तसेच 65 हजार रुपये किमतीची होंडा एस.पी.शाईन कंपनीची गाडी जप्त करत गुन्हा दाखल केला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी 04 जुलै रोजी केली आहे पुढील तपास पोलीस करत आहे.