नागपूर शहर: धक्कादायक: नायब तहसीलदार वैभव राठोड यांची राहत्या घरी आत्महत्या
शहरातील ग्रीन फिल्ड सोसायटीमध्ये राहणारे मौदा येथील नायब तहसीलदार वैभव रामेश्वर राठोड (वय ४२) यांनी रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.आज सुट्टी असल्याने वैभव राठोड घरीच होते. त्यांचे कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले असल्याने ते फ्लॅटमध्ये एकटेच होते. सायंकाळी त्यांची बहीण घरी आली असता, वारंवार आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही आणि फोनही उचलला जात नव्हता.