“प्रेमाचा आणि महाराष्ट्र हिताचा रंग उधळू या” – अंबादास दानवे यांचा रंगपंचमी संदेश
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 3, 2026
आज दिनांक 3 मार्च सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांनी घरासमोर रंग उधळत नागरिकांना रंगपंचमी व धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांसोबत सणाचा आनंद घेत “प्रेमाचा रंग, ऊर्जाचा रंग आणि महाराष्ट्र हिताचा रंग आपण सर्वांनी मिळून उधळू या” असा संदेश दिला. सणाच्या निमित्ताने मतभेद विसरून समाजात ऐक्य आणि आनंद वाढावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.