अर्जुनी मोरगाव: बोंडगावदेवी येथे जि प हाय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनाला जि प अध्यक्ष भेंडारकर उपस्थित
बोंडगाव देवी येथे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली . या कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक उपक्रम, प्रात्यक्षिके आणि मॉडेल्स सादर केले. विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांची सर्जनशीलता आणि जिज्ञासा पाहून आनंद वाटला असे याप्रसंगी लायकराम भेंडारकर म्हणाले.