आज दिनांक 30 डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय वरला येथे, नानाजी देशमुख कृषी प्रकल्प योजने अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच मनोज भारसाकडे यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीतुन या योजनेबाबतीत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आले. गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच मनोज भारसाकडे यांनी यावेळी गावकऱ्यांना केले