ठाणे: हातात लाठ्या-काठ्या घेऊन तडीपार गुंडांनी माशाचा पाडा येथे मुली आणि महिलांची काढली छेड, व्हिडीओ आला समोर
Thane, Thane | Oct 22, 2025 मीरा भाईंदर परिसरामध्ये तडीपार असलेल्या गुंडांनी दहशत माजवली आहे. आम्हाला फॉलो करा नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही तशी धमकी महिला आणि मुलींना देत आहेत. काल सकाळच्या सुमारास माशाचा पाढा येथे तडीपार गुंडांनी महिला आणि चिमुकल्या मुलींची हातात लाटा काट्या घेऊन छेड काढली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या तरुणांना देखील मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत