जळगाव: श्रीराम रथोत्सवात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारी 'लेडीज गँग' जेरबंद; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती
जुने जळगाव शहरात रविवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या श्रीराम रथोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या तीन महिलांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, ०३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.