तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत झालेल्या अपयशामुळेच सुधारणा विधेयक आणावे लागले, असे नमूद करत सामान्य जनतेच्या फायद्यासाठीच या सुधारणा असतील तर आम्ही विधेयकाला पाठिंबा देऊ, अशी स्पष्ट ग्वाही आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली. विधानसभा विधेयक क्रमांक ९४ (२०२५) चर्चेला येताना देशमुख म्हणाले की, “विधेयक शहरी समस्यांसाठी असले तरी ग्रामीण भागालाही त्याचा लाभ झाला पाहिजे.”