सर्वसामान्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा द्या : माजी मंत्री आ. संजय बनसोडे
महाआरोग्य शिबीराचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा
उदगीर : माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महा आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे मत
माजी मंत्री तथा आमदार आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
उदगीर येथील सामान्य रुग्णालयात आयोजीत माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबीरा प्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकट बेद्रे, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प. चे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार,जि. प. सदस्य तथा गटनेते प्रा. दिलीप मटके, मुकेश भालेराव, यमुनाजी भुजबळे, रामराव राठोड, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसभापती विक्की भोसले, न.प. चे गटनेते अनिल मुदाळे, बांधकाम सभापती राजकुमार भालेराव, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, शिवकुमार कांबळे, अॅड.वर्षा कांबळे, डाॅ.बालाजी बिरादार, समीर शेख, अमर सुर्यवंशी, नरसिंग शिंदे, व्यंकट बोईनवाड, धनाजी मुळे, इब्राहिम नाना पटेल, अरविंद गिलचे, नवनाथ गायकवाड, पं.स. गटनेते प्रकाश बिरादार, कमलाकर फुले, प्रकाश राठोड, संदिप बिरादार, शफी हाशमी, शंकर रोडगे, पृथ्वीराज पाटील, उर्मिला वाघमारे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो, शुभम भुमणे, बाबासाहेब सुर्यवंशी, राजु पाटील, सिमा नेत्रगावकर, डाॅ.सुमित होळीकर, डाॅ.सचिन जाधव, डाॅ.पांडुरंग होळीकर, डाॅ.अशोक सारडा, डाॅ.सुमित वाघमारे, डाॅ.सुनिल भागवत, डाॅ.स्वाती सोनवणे, डाॅ.शशिकांत देशपांडे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचे कार्य केले. त्याच प्रेरणेतून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महा आरोग्य शिबिरातून हजारो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक उपचारांचा लाभ मिळत आहे.
उदगीर हे तीन राज्याच्या सिमेवर असलेले शहर असुन येथे लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात असुन २०० खाटांचे सामान्य रुग्णालय आता ३०० खाटांचे करावे आणि स्वतंत्र १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याची मागणी मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नेत्रतपासणी, महिला व बालरोग, कान, नाक घसा तज्ञ, अस्थिरोग तसेच इतर विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचे वाटप व पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांकडे मार्गदर्शन करण्यात आले.
माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देत, आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंबाने निरोगी जीवन जगावे, असेही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे महा आरोग्य शिबिर सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.श्याम डावळे यांनी केले तर आभार अनिल मुदाळे यांनी मानले.
या महा आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Latur, Latur | Jul 27, 2026