TET परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने गोंधळ. घेण्यात येणाऱ्या TET परीक्षेत वेळेआधी उपस्थित न राहिल्याचा कारण देत अनेक विद्यार्थ्यांना अकोल्यातील समर्थ पब्लिक स्कूल परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील विविध भागातून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. नियमानुसार परीक्षेच्या 20 मिनिटे आधी केंद्राच्या परिसरात पोहोचणे बंधनकारक आहे.मात्र सकाळी 10.30 वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी 10.10 वाजता केंद्रावर पोहोचलेल्या परत पाठवले.