जालना: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात सेवा पंधरवडा; अप्पर जिल्हाधिकारी यांची माहिती
Jalna, Jalna | Sep 16, 2025 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार सेवा पंधरवडा जालना जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर 2025 पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती मंगळवार दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिली. हा सेवा पंधरवडा तीन टप्प्यांमध्ये राबवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांवर लक्ष केंद्रित केले.